मार्केट आउटलूक  : सेन्सेक्स, निफ्टीचा संमिश्र मूड 

मार्केट आउटलूक  : सेन्सेक्स, निफ्टीचा संमिश्र मूड 
मुंबई (14 फेब्रुवारी) : देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेला विक्रीचा मारा आणि जागतिक स्तरावर करोना व्हायरसचे नवे सापडू लागलेले रुग्ण अशा कारणांनी भारतीय शेअर मार्केटमध्ये गुरुवारी घसरणीचे चित्र पहायला मिळाले. गेल्या दोन सत्रातील तेजीची वाट सोडून सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली. सेन्सेक्स दिवसाअखेरीस 106 पॉइंट्सनी खालावून 41,459.79 वर पोहोचला तर निफ्टी 27 अंकांनी घसरून 12,174.65वर थांबला. बँक निफ्टीत 0.83 पॉइंट्सची घसरण झाली. तो 31,230.25वर पोहोचला. डेली चार्टमध्ये निफ्टीने बेअरिश कँडल फॉर्म केली असली तरी सपोर्ट लेव्हलला गुंतवणूकदार अट्रॅक्ट होऊ शकतात अथवा त्यांचा मूड बदलू शकतो असे तज्ज्ञांना वाटते.
आगामी सत्रामध्ये निफ्टी अपवर्ड मूव्हमेंटला 12,150 ते 12,350 पर्यंत जाऊ शकतो. जर त्यााची मेजर सपोर्ट लेव्हल चेंज झाली तर 12,000च्या झोनमधील डाउनट्रेंड राहू शकेल. कॉल ऑप्शन डाटामध्ये मॅक्झिमम कॉल ओपन इंटरेस्ट 12,500च्या स्ट्राइक प्राइजला 24.88 लाख काँट्रॅक्ट्स दिसून आले. फेब्रुवारी सिरीजमधील ही क्रुशल लेव्हल मानली जात आहे. 12,400च्या स्ट्राइक प्राइजला 
21.76 24.88 लाख काँट्रॅक्ट्स होते. तर 12,300च्या स्ट्राइक प्राइजला एकूण 18.44 लाख काँट्रॅक्ट्स सामावून घेण्यात आले. पूट ऑप्शन डाटामध्ये मॅक्झिमम पूट ओपन इंटरेस्ट 38.31 लाख काँट्रॅक्ट्स 12,000 च्या स्ट्राइक प्राइजला दिसले. तर 11,800 च्या स्टाइक प्राइजला 21.57 लाख काँट्रॅक्ट्स सामावून घेण्यात आले. याशिवाय, 11,900च्या स्ट्राइक प्राइजला 20.35 लाख काँट्रॅक्टस सामावून घेण्यात आले. 
फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी दिवसभरात 1,061.39 कोटींच्या शेअर्सची खरेदी केली. तर डोमॅस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी तब्बल 960.48 कोटींच्या शेअर्सची विक्री केल्याचे दिसले. आज शुक्रवारी, फोर्टिस हेल्थकेअर, एमएमटीसी, एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया, ओएनजीसी, माधव इन्फ्रा प्रोजेक्ट्स, कार्पोरेट कुरिअर अँड कार्गो, डीएमसी, एम्बसी ऑफिस पार्क्स रीट, डीसीएम आदी कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. तर व्होडाफोन आयडिया कंपनीला तिमाही निकालात सुमारे साडेसहा हजार कोटींचा तोटा झाल्याचे जाहीर झाले आहे. याशिवाय नेस्ले, फ्युचर रिटेल, अव्हेन्यू सुपरमार्केट, पेज इंडस्ट्रिज, अपोलो हॉस्पिटल्स आदी कंपन्यांचे शेअर्स दिवसभर फोकसमध्ये असतील. 
अमेरिकन मार्केटमध्ये कार्पोरेट अर्निंग आणि जागतिक स्तरावरील करोना व्हायरसच्या घडामोडींमुळे निगेटिव्ह चित्र दिसले. डाउ जोन्स इंडस्ट्रिअल अॅव्हरेज 128.11 पॉइंट्सनी घसरून 29,423.31 वर थांबला. तर एस अँड पी 500 इंडेक्स 5.51 पॉइंट्सनी घसरून 3,373.94 वर पोहोचला. नॅस्डॅक कम्पोझिट 13.99पॉइंट्स घसरून 9,711वर आला. एशियन मार्केटमध्ये ऑइल प्राइजमध्ये झालेली वाढ आणि चीनमध्ये करोना व्हायरसच्या फैलावातील वाढ यातून संमिश्र चित्र दिसले. जपानचा निक्केइ इंडेक्स, साउथ कोरियाचा कोपी इंडेक्समध्ये घसरण झाली. भारतीय रुपयाचे फ्लॅट ओपनिंग झाल्याचे दिसले. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया  71.33 पैशांवर ओपन झाला.