स्टॅाक फोकस - व्होडाफोन - आयडीच्या स्टॅाकमध्ये 18 टक्क्यांची घसरण

स्टॅाक फोकस - व्होडाफोन - आयडीच्या स्टॅाकमध्ये 18 टक्क्यांची घसरण
नवी दिल्ली (14 फेब्रुवारी) -आज शुक्रवार मार्केटच्या शेवटच्या सत्रात मार्केटची ओपनिंग प्लसने झाली. पण क्लोजिंग मात्र मायनसने झाले. क्लोजिंगच्या वेळेस सेन्सेक्स (202)  निफ्टी (61)  बॅंक निफ्टी (395) अंकानी घसरुन क्लोज झाला. आज व्होडाफोन आयडियाचे शेअर्स 9 टक्क्यांनी घसरले. यापूर्वी त्याचे शेअर्स 21 टक्क्यांनी वाढले आहेत. भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये 5% वाढ झाली होती. एजीआरच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर व्होडाफोन - आयडीच्या शेअर्स 18 टक्क्यांनी घसरले. पण भारती एअरटेलचा स्टॅाक 4 टक्क्यांनी वाढला. Bharti Airtel (4.64), Yes Bank (4.57), UPL (2.23), BPCL (1.59), HCL Tech (1.50) टक्क्यांनी वाढून आजच्या टॅाप गेनर्स ठरल्या. GAIL (-5.95), IndusInd Bank (-4.45), Bharti Infratel (-3.84), Power Grid Corp (-3.38), Eicher Motors (-3.37) टक्क्यांनी उतरुन आजच्या लो गेनर्स ठरल्या. Revathi CP, Jash Engineerin, SOLARA ACTIVE, Cosmo Films, Deepak Nitrite या कंपन्यानी 52 वीक हाय लेवल गाठली. SCAPDVR, JVL Agro Ind, KSK Energy Vent, Bkm industries, PSL या कंपन्यानी 52 वीक लो लेवल गाठली.