मार्केट आउटलूक :  निर्देशांकावर पुन्हा दबाव

मार्केट आउटलूक :  निर्देशांकावर पुन्हा दबाव
मुंबई (22 मे) : चीन आणि अमेरिका यांच्यात वाढलेला व्यापारातील तणावामुळे भारतीय शेअर मार्केट शुक्रवारी, सप्ताहाच्या पाचव्या सत्रात फ्लॅट ओपनिंग अथवा लोअर ओपनिंगची शक्यता दर्शवित आहे. चीनने हाँगकाँगसाठी राष्ट्रीय सुरक्षेचे नवे नियम लागू केल्यानेही मार्केटमध्ये जागतिक स्थिती नाजूक बनली आहे. एसजीएक्स निफ्टीचे निगेटिव्ह ओपनिंग होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. 

आयटीसी, टीसीएस, एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, रिलायन्स यांसारख्या हेविवेट शेअर्सनी घेतलेल्या उसळीने भारतीय शेअर मार्केट गुरुवारी, सप्ताहातील सलग तिसऱ्या सत्रात प्लसमध्ये क्लोज झाले. साप्ताहिक फ्युचर अँड ऑप्शनची एक्स्पायरी जवळ आली असल्याने मार्केटने दोन्ही बाजूंनी अस्थिरता अनुभवली. आता, शुक्रवारीही असाच ट्रेंड राहील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

गुरुवारी सेन्सेक्स 114 पॉइंटनी वाढून 30,932.90 वर क्लोज झाला तर निफ्टी 40 अंकांनी वाढून 9,106 पर्यंत पोहोचला. निफ्टी बँक 0.59 टक्के खालावून 17,735.10 पर्यंत पोहोचला. निफ्टीने जर 9,150 ची लेव्हल टिकवली तर निर्देशांक 9,300-9,350 च्या दिशेने झेप घेऊ शकतो असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. निफ्टीची सपोर्ट लेव्हल 8,991.18 ते 9,048.72 अशी प्लेस झाली आहे. निर्देशांक अपवर्ड मूव्ह झाला तर 9,171.17 च्या दिशेने जाऊ शकेल. 

कॉल ऑप्शन डाटामध्ये मॅक्झिमम कॉल ओपन इंटरेस्ट 9,500 च्या स्ट्राइक प्राइजला 23.22 लाख काँट्रॅक्ट्स होते. मे महिन्यातील ही क्रुशल रेजिस्टन्स लेव्हल मानली जात आहे. तर 9,300 च्या स्ट्राइक प्राइजला 17.53 लाख काँट्रॅक्टस दिसून आले. याशिवाय 9,200 च्या स्ट्राइक प्राइजला 15.32 लाख काँट्रॅक्ट्स सामावून घेण्यात आले. पूट ऑप्शन डाटामध्ये 9,000 च्या स्ट्राइक प्राइजला 32.85 लाख काँट्रक्ट्स होते. तर 8,800 च्या स्ट्राइक प्राइजला  15.63 लाख काँट्रॅक्ट्स दिसून आले. याशिवाय 8,700 च्या स्ट्राइक प्राइजला 12.06 लाख काँट्रॅक्ट्स सामावून घेण्यात आले. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी दिवसभरात 258.73 कोटींच्या शेअर्सची विक्री केली. तर डोमॅस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी  401.78  कोटींच्या शेअर्सची खरेदी केली. 

शुक्रवारी आयडीएफसी फर्स्ट बँक, युपीएल, ३ आय इन्फोटेक, बीएएसएफ इंडिया, बॉश, एस्सेल प्रोपॅक, गोदरेज इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील, सुप्रिम इंडस्ट्रीज, ट्रेंट आदी कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. तर क्वीक हील टेक्नॉलॉजी. व्हीएसटी इंडस्ट्रीज, जेसीटी, बजाज होल्डींग आदी कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये राहतील. 

अमेरिकन मार्केटमध्ये दोन महिन्याच्या उच्चाकांनंतर निर्देशांक घसरून बंद झाला. अमेरिका-चीन यांच्यातील तणावाचे प्रतिबिंब यामध्ये दिसले. जगातील दोन बलाढ्य अर्थव्यवस्थात झालेल्या व्यापार कराराविषयीची साशंकता यातून दिसून येत आहे. डाउ जोन्स इंडस्ट्रीअल अॅव्हरेज निर्देशांक 0.41 टक्क्यांनी घसरून 24,474.12वर आला. तर एस अँड पी 500 निर्देशांकात 0.78 टक्क्यांची घट होऊन तो 2,948.51 पर्यंत आला. नॅसडॅक कम्पोझिट निर्देशांक 0.97 टक्क्यांनी घसरून 9,284.88 वर पोहोचला. आशियाई मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळच्या सत्रात चीन-अमेरिका तणावाचे चित्र दिसले. शांघाई कम्पोझिट निर्देशांक 0.4 टक्क्यांनी तर निक्केई  225 निर्देशांकात 0.22 टक्क्यांची घसरण सकाळच्या सत्रात दिसली. कोस्पी निर्देशांकही 0.85 टक्क्यांनी घसरला.

कच्च्या तेलाच्या किमती मात्र दिवसेंदिवस वधारत असल्याचे दिसून येत आहे. चौथ्या सप्ताहातील उच्चांकी स्थितीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. ब्रेंट क्रूड 14 सेंट्सनी वाढून 36.20 डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले. एकूण 1 टक्क्यांनी किंमतीत वाढ झाली. वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट क्रुडही  5 सेंट्सनी वाढून 33.97 बॅरल प्रतिडॉलरवर पोहोचले.