ओपनिंग बेल - मायनस ओपनिंग, सेन्सेक्सची 111 अंकानी घसरण

ओपनिंग बेल - मायनस ओपनिंग, सेन्सेक्सची 111 अंकानी घसरण
मुंबई (22मे) - आज शुक्रवार भारतीय शेअर मार्केटच्या पाचव्या म्हणजेच शेवटच्या सत्रात ओपनिंग मायनसने झाले. बीएसई सेन्सेक्स 111.36 अंकानी घसरुन 30,821.54 तर एनएसई निफ्टी 38.35 अंकानी घसरुन 9,067.90 वर ओपन झाला. बॅंक निफ्टी 180.85 अंकानी उतरुन 17,554.25 ला ओपन झाला. आज एमसीएक्सवर सोने -  दरात वाढ तर चांदी दरात घसरण दिसुन आली. सोने दरात 125 अंकानी वाढ होवुन 46,542 तर चांदी दरात 167 अंकानी घसरण होवुन 47,650 वर आहे. अमेरिकन डॅालरच्या तुलनेत भारतीय रुपयात किरकोळ वाढ होवुन 75.71 वर ट्रेड करीत आहे.