मार्केट आउटलूक :  पॉझिटिव्ह मूड, मात्र इंडेक्सच्या अपट्रेंडमध्ये अडथळे  

मार्केट आउटलूक :  पॉझिटिव्ह मूड, मात्र इंडेक्सच्या अपट्रेंडमध्ये अडथळे  
मुंबई, (30 जून) : जागतिक स्तरावरील अनुकूल घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी भारतीय शेअर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह रॅलीची शक्यता आहे. अर्थव्यवस्था रिबाउंड होण्याच्या दृष्टीने होऊ लागलेली चांगली स्थिती, सावरलेले अमेरिकन मार्केट याची जोड मिळण्याची शक्यता आहे. एसजीएक्स निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह ओपनिंगचे ट्रेंड आहे. सिंगापूर मार्केटला निफ्टी फ्युचर 10,309 वर ट्रेंड करीत होता. दरम्यान, आगामी काळात मार्केटमध्ये अपट्रेंडचा मूड दिसत असला तरी त्याला अपसाइडचे रुप येण्यात अनेक अडथळे असतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था रुळावर येण्याची शक्यता कमी झाल्यामुळे काल, सोमवारी निर्देशांकात घसरण झाली. सेन्सेक्स 210 अंकांनी घसरून 34,961.52 आणि निफ्टी 71 अंकांनी खालावून 10,312.40 पर्यंत आला. तर बँक निफ्टी 1.08 टक्के खालावून 21,359 वर आला. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी दिवसभरात 1,937.06 कोटींच्या शेअर्सची विक्री केली तर डोमॅस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी 1,036.13 कोटींच्या शेअर्सची खरेदी केली. 

देशात काही राज्यांमध्ये लॉकडाउन वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. काही ठिकाणी लॉकडाउनचे निकष बदलण्यात आले आहेत. त्यामुळे निगेटिव्ह मूडच्या दिशेने वाटचाल करेल. अपट्रेंड कायम राहील. मात्र, अपसाइडला जाण्यात अनेक अडथळे राहतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पीव्होट चार्टनुसार निफ्टीची सपोर्ट लेव्हल 10,176.93 ते 10,244.67 अशी राहील. जर इंडेक्स अपवर्ड मूव्ह झाला तर त्याची रेजिस्टन्स लेव्हल 10,359.07च्या दिशेने जाईल. 
आज, मंगळवारी ओएनजीसी, व्होडाफोन आयडिया, एनबीसीसी, शालीमार पेंट्स, दीपक फर्टिलायझर्स, गॉडफ्रे फिलिप्स, आयसीआरए, मीश्र धातू निगम, द न्यू इंडिया अॅश्यूरन्स आदी कंपन्यांचे तिमाही अर्निंगचे निकाल जाहीर होतील. याशिवाय, गेल, ओरिएंच रिफॅक्टरीज, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल, टाटा पॉवर आदी कंपन्या विविध घडामोडींमुळे फोकसमध्ये राहतील. 

अमेरिकन मार्केटने सोमवारी उसळी घेतली. एसअँडपी निर्देशांकाने 1998नंतरची एका सप्ताहातील सर्वात मोठी वाढ मिळवली. अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होण्याच्या शक्यतेने मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे. डाउ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज निर्देशांक 580.25 पॉइंट्सनी वाढून 25,595.8 वर पोहोचला तर एस अँड पी 500 निर्देशांकात 44.19 अंकांची वाढ होऊन तो 3,053.24 वर गेला तर नॅसडॅक कम्पोझिट निर्देशांकात 116.93 अंकांची वाढ होऊन तो 9,874.15वर थांबला. आशियाई मार्केटमध्ये अमेरिकन मार्केटच्या पॉझिटिव्ह सेंटिमेंटचा परिणाम दिसून आला. ऑस्ट्रेलियन एस अँड पी निर्देशांक 1.15 टक्के तर जपानचा निक्केई 225 फ्युचर निर्देशांक  0.11 टक्के वाढला. हाँगकाँगचा हेंगसेंग निर्देशांकातही 0.62 टक्क्यांची वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याचे दिसून आले. जपानच्या इंडस्ट्रियल प्रॉडक्शन डाटाचा परिणाम झाल्याचे दिसले. डब्ल्यूटीआय क्रुड फ्युचरमध्ये 38 सेंट्सची घट होऊन 39.32 डॉलर प्रतिबॅरल तर ब्रेंट क्रुड फ्युचर 32 सेंट्सनी घसरून 41.53 डॉलर प्रतिबॅरलवर आले.