ओपनिंग बेल : गॅपअप ओपनिंग, निर्देशांकाची उसळी 

ओपनिंग बेल : गॅपअप ओपनिंग, निर्देशांकाची उसळी 
मुंबई, (30 जून) : भारतीय शेअर मार्केटमध्ये आज मंगळवारी, सप्ताहाच्या दुसऱ्या सत्रात निर्देशांकाने गॅपअप ओपनिंग दर्शविले. जागतिक स्तरावरील पॉझिटिव्ह ट्रेंड, अर्थव्यवस्था सुरळीत होण्याबाबतची अपेक्षा यातून मार्केटने पॉझिटिव्ह व्हूय दर्शविली आहे. त्यात गुंतवणूकदारांकडून प्रॉफिट बुकिंगची शक्यता वर्तवली जात आहे. 
सकाळी बीएसई सेन्सेक्स 206.66 पॉईंट्सनी वाढून 35,168.18 तर एनएसई निफ्टी 70.20 पॉईंट्सनी वाढ होऊन 10,382.60 वर ओपन झाले. बॅंक निफ्टीही 165.30 पॉईंट्सनी वधारून 21524.30 वर ओपन झाला.
आज डॉलरच्या तुलनेत रुपया फ्लॅट 75.64 वर ओपन झाला. सोने-चांदीमध्ये वाढ दिसून आली. आज एमसीएक्समध्ये गोल्ड फ्युचर कॉन्ट्रॅक्ट 0.06 टक्के वधारून 48275 तर सिल्वर मिनी कॉन्ट्रॅक्ट 0.36 टक्क्यांनी वाढून 48295 वर ओपन झाले. क्रूड ऑईलमध्ये मात्र 17 अंकांची घसरण दिसून आली.