म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसाठी पॅन डिटेल्स करा अपडे

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसाठी पॅन डिटेल्स करा अपडेट

    सोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाने आता गुंतवणूकदारांना त्यांच्या म्युच्युअल फंडातून पैसे काढण्यासाठी पर्मनंट अकाउंट नंबर अर्थात ‘पॅन’ क्रमांकाची माहिती अत्यावश्यक असल्याचे जाहीर केले आहे. ‘सेबी’ने अलिकडेच केलेल्या पाहणीत म्युच्युअल फंड आणि रजिस्टार अँड ट्रान्सफर एजंट्स (आरटीए)ने गुंतवणुकीतून पैसे काढण्याच्या केलेल्या प्रक्रियेवेळी पॅन डिटेल्स उपलब्ध नसल्याचे दिसून आले होते. त्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत.
    म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना आपल्या केवायसीची (ग्राहक ओळख प्रक्रिया) प्रक्रिया पूर्ण करताना पॅन खात्याचे विवरण देणे अनिवार्य ठरणार आहे. मात्र, काही श्रेणीतील गुंतवणूकदारांना पॅन क्रमांकाचे विवरण देण्यापासून सवलत देण्यात आली आहे. जे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये दरवर्षी ५० हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक करतात, त्यांना ‘पॅन’ क्रमांक देण्याची गरज भासणार नाही. या गुंतवणूकदारांना ‘पॅन’ ऐवजी आपल्या ओळखीचे अन्य अधिकृत पुरावे देता येतील. हे पुरावे त्यांच्या अकाउंटसाठी पुरेसे ठरतील. त्यांच्यासाठी पॅन-केवायईटी-केवायसी संदर्भ क्रमांक पुरेसा ठरणार आहे.
    ज्या गुंतवणूकदारांना आपले पॅन डिटेल्स अपडेट करायचे असतील, त्यांना त्यांच्या म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवर जाऊन आपल्या नियमित डिटेल्सनी लॉग इन करून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. प्रमाणीकरणासाठी आपली जन्मतारीख अथवा बँक क्रमांक त्यासाठी भरावा लागेल. सर्वांना स्व स्वाक्षांकित केलेली पॅन कार्डची फोटोकॉपी अपलोड करावी लागेल. या इमेजची साइज १ एमबीपेक्षा अधिक असू नये. आरटीएकडे असलेल्या रेकॉर्डनुसार स्वाक्षरीची पडताळणी केलेली असली पाहिजे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधीत खातेधारकाला त्याची सूचना दिली जाईल. आपल्या प्रत्येक गुंतवणूकीसाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. आपल्या म्युच्युअल फंडाच्या ब्रोकर अथवा कंपनीच्या एजन्सीच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करणे हा एक सोपा मार्ग यासाठी आहे. जर आपल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीला पॅन डिटेल्स अपडेट केले नाही, तर सर्व प्रक्रारची आर्थिक देवाण-घेवाण, फंडातून पैसे काढण्याची प्रक्रिया अडविली जाण्याचा धोका आहे. ज्या गुंतवणूकदारांना आपल्या गुतवणूक केलेल्या रक्कमेतून काही पैसे काढायचे असतील, त्यावेळी त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी स्वत: साक्षांकित केलेली पॅन क्रमांकाची फोटोकॉपी सादर करावी लागेल.
(Published On 28/03/2020)

News-In-Focus