म्युच्यूअल फंड गुंतवणूकदारांनी एसआयपीवर कमावले 49 हजार कोटी

म्युच्यूअल फंड गुंतवणूकदारांनी एसआयपीवर कमावले 49 हजार कोटी

    रिटेल इन्व्हेस्टर्स म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी एसआयपीचा ऑप्शन पसंद करीत आहेत. आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून 49000 कोटी रुपये उलाढाल झाली आहे. गेल्यावर्षी या कालावधीच्या तुलनेत ही रक्कम 11 टक्क्यांनी जास्त आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर 2018 या कालावधीत अशा प्रकारच्या योजनांतून  44,487 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.  
    सिस्टिमॅटीक इन्व्हेस्टमेंट पंड अर्थात एसआयपी हा रिटेल गुंतवणूकदारांचा सर्वात आवडता प्रकार मानला जातो. या माध्यमातून म्युच्युअल पंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांना मार्केट टायमिंग रिस्क कमी करण्यास मदत मिळते. उपलब्ध आकडेवारीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर 2019-20 या कालावधीतील एसआयपी काँट्रिब्युशन 49,361 कोटी रुपये झाले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंतच्या बारा महिन्यांमध्ये एसआयपीच्या अॅव्हरेजमध्ये 8,000 कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे.
    गेल्या काही वर्षांपासून एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकीत वृद्धी होताना दिसून आली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये एसआयपीच्या माध्यमातून 92,700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.  2017-18 मध्ये हीच गुंतवणूक 67,000 कोटी रुपयांवर होती. तर त्याआधीच्या वर्षात  2016-17 मध्ये म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीच्या माध्यमातून 43,900 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. सद्यस्थितीत भारतीय म्युच्युअल फंड योजनांमध्ये  2.84 कोटी एसआयपी अकाउंट्स असून त्यांच्या माध्यमातून स्थानिक गुंतवणूकदार नियमित गुंतवणूक करतात. या क्षेत्रात 2019-20 या आर्थिक वर्षात दर महिन्याला सरासरी 9.29 लाख नवे एसआयपी अकाउंट्स वाढत असल्याचे दिसून आले आहे.
    एएमएफआईच्या सीईओ एन. एस. व्यंकटेश यांच्या म्हणण्यानुसार, नव्या एसआयपी अकाउंट्सच्या माध्यमातून गुंतवणुकीचा वेगही वाढला आहे. या माध्यमातून एकूण बाजारात आम्ही सर्वोत्तम प्रदर्शन करू शकतो. गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदार इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरू ठेवतात. म्युच्युअल फंड क्षेत्रात 44 प्रमुख पॅकेजिस असून त्यांच्या माध्यमातून सप्टेंबरअखेर झालेली वार्षिक उलाढाल 25.68 लाख कोटी रुपयांची आहे, जी त्यापूर्वीच्या, सप्टेंबर 2018पूर्वीअखेरपर्यंत झालेल्या  24.31 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. एकाचवेळी मोठ्या रक्कमेची गुंतवणूक करणे शक्य नसलेल्या गुंतवणूकदारांसाठी दर महिन्याला ठराविक रक्कमेचीं निश्चित गुंतवणूक करणारा हा प्रकार खूप उपयुक्त ठरलेला आहे. गुंतवणूकीसाठी साप्ताहिक, मासिक अथवा त्रैमासिक असे विकल्प देण्यात आले आहेत. त्यातून दर महिन्याला समान रक्कमेची गुंतवणूक केली जाते.
(Published On 18/04/2020)

News-In-Focus