विकली आउटलूक : लॉकडाउनमुळे घसरणीचा ट्रेंड

विकली आउटलूक : लॉकडाउनमुळे घसरणीचा ट्रेंड

मुंबई (17 मे) : केंद्र सरकारने कोवीड 19साठी जाहीर केलेल्या पॅकेज भारतीय शेअर मार्केटला बुस्ट करण्यास असमर्थ ठरले. त्यातून 15मे रोजी संपल्येल्या दुसऱ्या सप्ताहात बाजाराने घसरण अनुभवली. केंद्र सरकारकडून पॅकेजला झालेला उशीर, कोरोना व्हायरसबाधीत नागरिकांची वाढती संख्या, त्याचा अर्थव्यवस्थेला बसलेला फटका आणि अमेरिका-चीन यांच्यातील ताणलेले संबंध यामुळे सेन्सेक्स 1.7 टक्के तर निफ्टी 50 निर्देशांक 1.2 टक्क्यांनी घसरला. आगामी सत्रातही कोरोनाची वाढती रुग्णसंख्येमुळे मार्केटमध्ये अस्थिरता टिकून राहील. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याबाबतची साशंकता याला कारणीभूत असेल. मार्केट ऑपरेटर्सच्या ताब्यातच असेल असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

केंद्र सरकारने आपल्या प्राथमिकतेचे स्पष्टीकरण दिले आहे. अशात लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याविषयी उत्सुकता आहे. बाजारातही महागाईचा दर, कंपन्यांचे तिमाही अर्निंग्ज याचा परिणाम लक्षात घेऊन गुंतवणूक होईल असे तज्ज्ञांना वाटते. अमेरिका-चीन यांच्यातील बिघडत्या संबंधांमुळे जगभरातील गुंतवणूकदार धास्तावले आहेत. आर्थिक तरतला टिकून रहावी, प्रॉफिट बुकिंगसाठी गुंतवणूकदारांचे प्रयत्न हवेत असे तज्ज्ञांना वाटते. 

कोरोना व्हायरसचे वाढते रुग्ण ही मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात रुग्णसंख्या वाढत आहे. उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र 30 टक्क्यांवरून 35 टक्क्यांवर आले आहे. देशात नव्या केसिस दाखल होत असल्या तरी हा मोठा दिलासा आहे. भारताने चीनची रुग्णसंख्या ओलांडली आहे. देशात 86,000 रुग्ण आणि 2,750 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जागतिक स्तरावर 46.3 लाख जणांना बाधा आणि 3.11 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे. अशात केंद्र सरकार लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात पोहोचले आहे. 18 मे रोजी चौथा टप्पा सुरू होईल. 12 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे नियम, सूचना असतील असे सांगितले आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योग आणि दुकाने व्यापक प्रमाणावर खुली होतील. फक्त सोशल डिस्टन्सची सक्ती अधिक असेल. त्याचा परिणाम मार्केटवर होईल. 

याशिवाय, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या राइट्स इश्यूची जोरदार चर्चा मार्केटमध्ये आहे. 20 मे रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांच्या 53,125 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी राइट्स इश्युची घोषणा करेल. त्यांची गेल्या तीन दशकातील ही सर्वात मोठी योजना आहे. या योजनेची अंतिम मुदत 3 जून आहे. कंपनीने राइट इश्यू प्राइज 1,257 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. 14 मे रोजी असलेल्या प्रत्येक भागधारकाला प्रत्येकी 15 शेअर्सना एक शेअर दिला जाणार आहे. बाजारातील सध्याची निगेटिव्ह स्थिती पाहता रिलायन्सचा हा इश्यू मार्केटला बुस्ट करण्यास उपयुक्त ठरेल. त्याचा रिस्पॉन्स बाजारातील ताकद अथवा कमजोरीविषयीचे चित्र स्पष्ट करेल. 

वेदांता कंपनीचे डिलिस्टिंगचे प्रपोजलही बाजारासाठी औत्सुक्याचे आहे. अब्जाधिश अनिल अग्रवाल यांनी वेदांताचे गुंतवणूकदारांकडील शेअर्स खरेदी करून ही कंपनी प्रायव्हेट करण्याचा निर्णय घेतला आहे. 18 मे रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची याबाबत बैठक होणार आहे. यासाठी एसबीआय कॅपिटल मार्केट्सला व्यापारी बँकर म्हणून नियुक्त केले गेले आहे. वेदांताच्या प्रमोटर्सनी 48.94 टक्के शेअर्स हे 87.5 रुपये प्रतिशेअर दराने खरेदी करण्याची तयारी दर्शवली. ही किंमत 11 मे रोजी असणाऱ्या किमतीपेक्षा 9.9 टक्के अधिक होती. मात्र सध्या ऑफर प्राइजपेक्षा 6.2 टक्के अधिक दराने ट्रेडिंग सुरू आहे. त्यामुळे शेअरधारक यासाठी कशी मान्यता देतात याबाबत उत्सुकता असेल. 

कंपन्यांचे तिमाही निकाल (अर्निंग्ज) याचाही प्रभाव या आठवड्यात राहील. या आठवड्यात निकाल जाहीर करणाऱ्या कंपन्यांची संख्या 80 इतकी मर्यादीत असली तरी त्यात बड्या कंपन्यांचा समावेश आहे. भारती एअरटेल, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, युपीएल, अल्ट्राटेक सिमेंट, अॅव्हेन्यू सुपरमार्ट (डी मार्ट), टाटा पॉवर, जेएसडब्ल्यू एनर्जी, कोलगेट पामोलिव्ह, बजाज फिनसर्व्ह आदी कंपन्यांचा निकाल जाहीर होईल. टोरॅंट पॉवर, डॉ. लाल पॅथलॅब्ज, डेल्टा कार्पोरेशन, अपोलो टायर्स, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, एल अँड टी इन्फोटेक, कल्पतरु पॉवर, जेके लक्ष्मी सिमेंट, टाटा मेटॅलिक्स, हिंदूस्थान झिंक, बीएसई, आयडीएफसी फर्स्ट बँक, ब़श, डीसीबी बँक आदींकडून तिमाही निकाल जाहीर होईल. 

अमेरिका-चीन यांच्यातील तणाव गेल्या आठवड्यात समोर आला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनविरोधात थेट भूमिका घेतील असे संकेत आहेत. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेने दुसऱ्या क्रमांकाशी घेतलेले वैर हे बाजाराचे समिकरण बदलणारे ठरतील. हुवाई टेक्नॉलॉजीच्या प्रकरणातून तणाव स्पष्ट झाला आहे. याशिवाय, कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा परतीचा मार्ग स्वीकारला आहे. अर्थव्यवस्था खुल्या होऊ लागल्याने ब्रेंट क्रूड वायदा बाजारात 30 डॉलर प्रतिबॅरलच्या स्तरावर आला. तेथून त्यात 5 टक्क्यांची वाढ होऊन तो 32.50 डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचला. सौदी अरेबीयाशी टक्कर देण्यासाठी अमेरिकेने केलेली उत्पादन कपात यास कारणीभूत ठरली आहे. पण तज्ज्ञांना यात फार वाढ होण्याची अपेक्षा नाही. 
टेक्निकली आगामी आठवड्यात निफ्टीचा डाउनट्रेंड 8,500 ते 8,900 अथवा अपट्रेंड 9,300च्या दिशेने राहू शकेल. जर निफ्टीने 9,050 चा रेजिस्टन्स तोडला तर तो 8,500च्या डाउनट्रेंडला जाण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 9,000 च्या स्ट्राइक प्राइजला फार मूव्हमेंट असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

 

News-In-Focus