विकली आउटलूक : अस्थिरतेसह तेजीचे नवे सत्र

विकली आउटलूक : अस्थिरतेसह तेजीचे नवे सत्र
मुंबई, (28 जून ) : भारतीय शेअर मार्केटमध्ये या सप्ताहात बेंचमार्क इंडेक्सने तीन टक्क्यांची वाढ मिळवली. तर सलग दुसऱ्या सप्ताहात बाजारात तेजीचे चित्र दिसले. काही सत्रांमध्ये समायोजनाची चिन्हे दिसून आली. तज्ज्ञांच्या मते, मार्केटवर आगामी सत्रात तेजीचा ट्रेंड असेल. मात्र, भारत-चीनमधील तणाव आणि अमेरिका-चीन यांच्यातील वादाचे पडसाद परिणाम घडवू शकतील. 

जुलैपासून सुरू होत असलेल्या आर्थिक व्यवहारांना येणारी गती, सरकारकडून आणखी एखाद्या प्रोत्साहनपर पॅकेजची अपेक्षा, मार्चच्या तिमाहीतील आर्थिक तरलतेचा सपोर्ट यातून मार्केटने जवळपास 1.3 टप्प्यांची वाढ मिळवली. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने होणाऱ्या परिणामांचा धोका गुंतवणूकदारांना सतावत आहे. 23 मार्चच्या लोपासून 36 टक्क्यांची वाढ मिळवली आहे. अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठीची प्रक्रिया गतीने होण्याची गरज आहे. निफ्टी आगामी आपल्या टार्गेटच्या निगेटिव्ह जाण्याचीही शक्यता आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येवर मार्केटची आगामी वाटचाल अवलंबून राहील असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, सद्यस्थितीत मार्केट पॉझिटिव्ह साइडला अधिक झुकले आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सकडून विक्रीचा दबाव वाढला आहे. त्यामुळे आपल्या टार्गेटकडे पोहोचण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थिती केंद्र सरकारने जूनपासून अर्थव्यवस्थेला अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही तपासली जात आहे. जुलैपासून अशी लाट येऊ शकण्याची शक्यता असली तरी अनलॉकचा दुसरा टप्पा आता सुरू होऊ शकतो. मॉन्सूनचा परिणामही होईल. काही राज्यांनी लॉकडाउन जुलै अखेरपर्यंत पुढे सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे एकूणच घडामोडींबाबत गुंतवणुकदारांमध्ये उत्सुकता आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येची वाढ होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत संपूर्ण अर्थव्यवस्था खुली होण्याची अपेक्षा तज्ज्ञांना आहे. भारतात सद्यस्थितीत दररोज 15,000 नवे रुग्ण आढळून येत आहेत. पाच लाखांहून अधिक रुग्णसंख्या झाली असून आजवर 15,685 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 58 टक्क्यांवर आले आहे. जागतिक स्तरावर जवळपास एक कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 49 लाख जणांता मृत्यू झाला आहे. 

काही कार्पोरेट कंपन्यांच्या मागणीनंतर सेबीने तिमाही अर्निंग्ज जाहीर करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. आता या टप्प्यात 1,420 कंपन्या आपला निकाल जाहीर करणार आहेत. त्यापैकी पहिल्या आठवड्यात 1,408 कंपन्यांचा समावेश आहे. यातील बहूतांश कंपन्या मीडकॅप, स्मॉलकॅप आणि पेन्नी स्टॉक्सचा समावेश आहे. ओएनजीसी, व्होडाफोन आयडिया, भारत फोर्ज, भारत इलेक्ट्रॉनिक्स, पेट्रोनेट, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एमआयएफ, फोर्ज मोटर्स, जीएमआर इन्फ्रा, रेमेंड, श्री रेणुका शुगर्स, दिपक फर्टिलायझर्स, डिश टीव्ही, गॉडफ्रे फिलिप्स, मिश्र धातू निगम, एनबीसीसी, न्यू इंडिया अॅशूरन्स, पीसी ज्वेलर्स, सेल, पेसी ज्वेलर्स आदी कंपन्यांचा यात समावेश आहे. एप्रिलमध्ये झालेल्या वॉशआउटनंतर मे महिन्यातही ऑटो कंपन्यांनाही मिश्र कामगिरी केली. तज्ज्ञांच्या मते पावसाच्या चांगल्या अनुमानामुळे दुचाकी आणि ट्रॅक्टर विक्रीत सुधारणांची शक्यता आहे.

जूनच्या टप्प्यात विक्री वाढली असल्याचीही शक्यता आहे. जुलैच्या पहिल्या टप्प्यात हिरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, एस्कॉर्ट, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर, टाटा मोटर्स आदी कंपन्यांवर अधिक लक्ष राहिल. कच्च्या तेलाच्या किमती 40-41 रुपये प्रतिबॅरलवर स्थिरावल्या आहेत. ही भारतासाठी सकारात्मक बाब म्हटली पाहिजे. गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या दरात आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 डॉलर प्रतिबॅरलचे करेक्शन झाल्याचे आढळते. मात्र, आगामी काळातही यातील डाउनट्रेंड सुरूच राहणार असल्याचे दिसून येते. टेक्निकली निफ्टी 50 या आठवड्यात 1.35 टक्क्यांची वाढ मिळवली. डेली चार्टमध्ये दोजी कँडल फॉर्म झाली आहे. आगामी काळात निफ्टीची रेंज 10,050-10,550 अशी राहील. 

News-In-Focus