क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी हे सोपे उपाय

क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी हे सोपे उपाय

र तुम्ही एखाद्या बँकेकडे कर्ज मागण्यासाठी जेव्हा अॅप्लिकेशन करता, तेव्हा पहिल्यांदा बँक तुमच्या आर्थिक स्थितीची माहिती घेते. तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करू शकता की नाही हे जाणून घेणे बँकेला महत्त्वाचे वाटते. या प्रक्रियेत क्रेडिट स्कोअर सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. क्रेडिट स्कोअरच्या माध्यमातून ग्राहकाची सर्व माहिती बँकेला मिळते. जेवढा तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तेवढे कर्ज मिळवणे सोपे जाते. क्रेडिट स्कोअरची रेंज 300-900 यांदरम्यान असते. यापैकी 550-700 यांदरम्यानचा स्कोअर हा चांगला असतो तर 700-900 यांदरम्यानचा स्कोअर हा सर्वोत्तम मानला जातो. जर तुम्हाला आपला स्को्र चांगला ठिवायचा असेल तर काही गोष्टींची दक्षता घेणे महत्त्वाचे ठरते.
हफ्ते वेळेवर भरा  : जर तुम्ही एखादे कर्ज घेतले असेल, तर त्याची परतफेड, हफ्ते वेळेवर भरा. त्यात टाळाटाळ करून नका. तसे केल्यास क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. त्यासाठी ऑटो डेबिटचा पर्याय कधीची चांगला. 
विविध प्रकारच्या कर्जांची परतफेड  : एखाद्या व्यक्तीने विविध प्रकारची कर्ज घेतली असतील आणि ती वेळेवर फेडली असतील तर त्याचा स्कोअर चांगला असतो. चांगल्या स्कोअरसाठी लोन हिंस्ट्री चांगली हवी. कमी - अधिक कालावधीच्या कर्जांचा समावेश असणे चांगले ठरते. 
ज्वाइंट अकाउंटवर लक्ष ठेवा  : जर तुम्ही एकादे कर्ज संयुक्तपणे, भागिदारीत घेतले असेल तर त्याच्या परतफेडीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या कर्जावेळी ईएमआय पेमेंटची समान भागिदारी असते. त्याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर पडत. जेव्हा तुम्ही दुसऱ्यासोबत कर्ज घेता, तेव्हा परतफेडीची हमीही तितकीच असते. 
रिपोर्ट तपासा  : ग्राहकांना सिबिलच्या वेबसाइटवर ठराविक शुल्क अकारून क्रेडिट रिपोर्ट पाहता येतो. जर तुमच्या रिपोर्टमध्ये काही अडचणी असतील, तर त्याच्या सुधारणेची प्रक्रियाही करता येते. 

News-In-Focus