क्युअरफीट करणार रेडी टू इट सेगमेंटमध्ये प्रवेश

क्युरेफिट करणार रेडी टू इट सेगमेंटमध्ये प्रवेश

बेंगळुरूस्थित हेल्थ आणि फिटनेस स्टार्टअप असलेल्या क्युरेफिटने रेडी टू इट फुड सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतःची फूडटेक इटफीट सेक्टरचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पॅक्ड खाद्य व्यवसायाला बळ दिले जाणार आहे. इटफीटच्या माध्यमातून नव्या उत्पादनांसह प्रोटिन आणि वर्कआउट सप्लिमेंट मार्केटवरही भर देण्याचे नियोजन क्युरेफिटने केले आहे. 

इटफिटच्या सेवा देशातील अठरा शहरांपैकी दिल्ली, बेंगळुरू, हैदराबादसह फक्त चार शहरांमध्येच सुरू आहे. कोरोना व्हायरसमुळे सुरू झालेल्या लॉकडाउनचा फटका फुड डिलिव्हरी बिझनेसला बसल्याचे क्युरेफिटचे सहसंस्थापक अंकित नागोरी यांनी सांगितले. कोरोनापूर्वीच्या काळात इटफिट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दररोज 50,000 ऑर्डर्स मिळत होत्या. आता त्या अवघ्या 15,000 वर आल्या आहेत. क्युरेफिटने स्वतःची क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट बंद केली आहेत. काही कालावधीसाठी ती बंदच राहतील. काही ठिकाणांचा वापर किचनसाठी केला जाणार आहे. क्युरेफिटने आपल्या एमटीआरसारख्या प्रतिस्पर्ध्यांशी टक्कर देण्यासाठी पॅक्ड फुड सेगमेंटकडे लक्ष दिले आहे. या कॅटॅगिरीत आगामी सहा महिन्यात, डिसेंबर अखेरपर्यंत किमान 50 टक्के व्यवसाय मिळविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. कोरोना नंतरच्या काळातील उद्योगाची गरज लक्षात घेऊन पॅकेज्ड फूड आणि रेडी टू इट कॅटॅगिरीवर भर देण्यात येणार असल्याचे नागोरी यांनी सांगितले.

क्युरेफीटने राजमा आणि दाल करी अशी डीश लाँच केली आहे. दर महिन्याला अशा प्रकारच्या दोन स्टॉक किपिंग युनीट्स वाढवण्यात येणार आहेत. डिसेंबर महिन्यापर्यंत याची पूर्तता करण्याचे टार्गेट आहे. झोमॅटो, बिग बास्केट, स्वीगी यांसारख्या फुड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसोबत क्युरेफिटची फुड डिलिव्हरीसाठी पार्टनरशीप असेल. आगामी काही महिन्यात इटफीटकडून पॅकेज्ड गुड्स, इम्युनिटी बिल्डिंग ड्रिंक्स, ज्युस यावरही भर देण्यात येणार आहे. या पदार्थांना अधिक मागणी असेल असे इटफीटचे म्हणणे आहे. ग्राहकांच्या खाद्यपदार्थांबाबतच्या सवयी बदलत चालल्या आहेत. कुटुंबासाठी एकाचवेळी मोठी खरेदी करण्याचा ट्रेंड दिसू लागला आहे. आठवड्यातून एखाद्या वेळी डेझर्ट अथवा पिझ्झासारखा पदार्थ चेंज म्हणून खाल्ला जातो. या बाबी लक्षात घेऊन लील्स सीन हा डेझर्टचा ब्रँड विकसीत केला जात आहे. प्रोटिन आणि फिटनेस वर्कआउट सप्लिमेंट प्रॉडक्ट्सची वाढती मागणी लक्षात घेऊन इटफीटकडून काही पार्टनर्ससोबत त्याचाही विकास केला जाणार आहे. यापूर्वी रॉफीट लाइन ज्युस लाँच करण्यात आला होता. ऑफलाइन माध्यमातूनही इटफीटचा मोठा बिझनेस ट्रेंड सुरू आहे. मात्र, त्याला कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे फटका बसला आहे. फुड सबस्क्रीप्शनवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसते. मात्र, ही परिस्थितीत लवकरच बदलेल असे कंपनीचे म्हणणे आहे. अॅस्सेल आणि क्राइट या गुंतवणूकदारांसह क्युरेफीटने मार्च महिन्यात टीमसेक या सिंगापूरस्थित गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 832 कोटी रुपयांचे फंड रेजिंग केले आहे. 

News-In-Focus