विकली फ्लॅशबॅक : प्रॉफिट बुकिंगसह स्मार्ट बाइंगचा ट्रेंड 

विकली फ्लॅशबॅक : प्रॉफिट बुकिंगसह स्मार्ट बाइंगचा ट्रेंड 
मुंबई ( 1 ऑगस्ट) : भारतीय शेअर मार्केटमध्ये सरत्या सप्ताहातील पाच सत्रांपैकी एकाच दिवशी राहिलेल्या पॉझिटिव्ह ट्रेंडचा अपवाद वगळता नकारात्मक मूडने निफ्टीला 11100पासून मागे खेचण्याचा प्रयत्न केला. एकप्रकारे अस्थिर मार्केटची चाहूल येथे दर्शवली गेली. निफ्टी 50 मंदीची दिशा दर्शवित आहे. त्याखालील टप्प्यात निर्देशांक 10600च्या दिशेने जाऊ शकतो. त्यादृष्टीने आगामी दोन आठवडे महत्त्वाचे ठरतील. सप्ताहात प्रॉफिट बुकिंगसह स्मार्ट बाइंगचा ट्रेंड दिसला आहे. 

27 जुलै रोजी सप्ताहाची सुरुवात फ्लॅट ओपनिंगने झाले. मात्र, नंतर इंडेक्समध्ये जोरदार घसरण झाली. बँक निफ्टीला तर तब्बल 813 अंकांची घसरण झाली. नंतर त्याचे क्लोजिंग मायनसमध्ये झाले. सेन्सेक्स 194.17अंकांनी घसरून  37,934.73 वर आणि निफ्टी -62.35 अंकांनी खालावून 11,131.80 वर क्लोज झाला. बॅंक निफ्टी 21,848.75 वर आला. सप्ताहाच्या दुसऱ्या सत्रात, मंगळवारी निर्देशांकाने 558 अंकांची उसळी घेतली तर निफ्टीने 11300च्या वरचा टप्पा सर केला. पॉझिटिव्ह ट्रेंड दिवसभर राहिला. मात्र, बुधवारी सप्ताहाच्या तिसऱ्या सत्रात निर्देशांक पु्न्हा कोसळला. सेन्सेक्समध्ये 421 अंकांची घसरण झाली तर निफ्टीला 11,200चा आपला सपोर्ट कसाबसा टिकवता आला. फ्लॅट ओपनिंगचा मार्केटचा ट्रेंड असाच कायम राहिला. गुरुवारी, सप्ताहाच्या चौथ्या सत्रात मार्केट प्रचंड व्होलाटाइल राहिले. क्लोजिंग किरकोळ मायनसमध्ये झाले. शुक्रवारी, सप्ताहाच्या अखेरीस अशीच स्थिती कायम राहिली. सेन्सेक्स 129.18 अंकांनी घसरून 37606.89 वर आणि निफ्टी 13.90 अंकांनी घटून 11088.30  वर थांबला. वायजे बाजारात सोने, चांदीच्या दरातही वाढीचा ट्रेंड राहिला. 

या सप्ताहाच्या अखेरीस सोने 53650 वर तर चांदी  64975 वर पोहोचली. बुल्सनी जुलै महिन्यात प्रॉफिट बुकिंगचा ट्रेंड ठेवल्याचे दिसून येते. सेन्सेक्स आणि निफ्टी 7 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. मीडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सना या महिन्यांत चांगली स्पेस मिळाल्याचे दिसून आले. एसअँडपी बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स आणि मीडकॅप इंडेक्स 5 टक्क्यांची वाढ दर्शवली. बीएसई  500 निर्देशांकातील 100 स्टॉक्स 10-80 टक्के वधारल्याचे दिसून आले. यातील 126 स्टॉक्स वाढले. कॅडिला हेल्थकेअर, पीव्हीआर, बँक ऑफ महाराष्ट्र, महिंद्रा अँड महिंद्रा, डॉ. लाल पॅथलॅब्स, हेरिटेज फुड्स, एलअँडटी इन्फोटेक आदींचा यात समावेश आहे. 

मार्च महिन्यात झालेल्या ऐतिहासिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर किंमत घसरलेले शेअर्स आता तेजीच्या ट्रेंडवर आहेत. 23 मार्च रोजी सेन्सेक्स 25,981 या निच्चांकी स्तरावर होता. त्यावेळी 890 शेअर असे होते की ज्यांचा दर 20 रुपयांपेक्षा कमी होते. आता या शेअर्समध्ये सरासरी 60 टक्क्यांची तेजी आली आहे. बेंचमार्क इंडेक्स या तुलनेत 45 टक्के वधारला आहे. यापैकी 767 शेअर्सनी 23 मार्चच्या तुलनेत सकारात्मक रिटर्न दिले आहेत. तर 157 शेअर्स दुप्पट रिटर्नवर पोहोचले आहेत. आर्थिक उलाढाल ठप्प झाली असताना या शेअर्समधील तेजीने गुंतवणुकदारांना आश्चर्यचकित केले आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दरही वधारले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रकोप पाहता धातूच्या मागणीत वाढ झाली आहे. सोने 1,958.99 डॉलर प्रति औंसच्या दरावर आहे. सद्यस्थितीत सोने दहा टक्क्यांनी वाढल्याचे दिसते. 

मीड आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये उच्च मूल्यांकन वाढल्याचे दिसते. आयटी, एनर्जी आणि हेल्थकेअर या सेक्टर्समध्ये स्मार्ट बाइंगचा ट्रेंड या महिन्यात दिसून आला आहे. तब्बल 10 टक्क्यांहून अधिक वाढ या क्षेत्रात दिसली. इन्फ्रा, युटिलीटी, टेलिकॉम, पॉवर, कॅपिटल गुड्स आणि रिअॅल्टी या सेक्टरमध्ये सेलिंगचे प्रेशर दिसले. आयटी आणि फार्मा हे ग्लोबल प्लेसर्स ठरले आहेत. आयटी सेक्टरमध्ये या महिन्यात 22.4 टक्क्यांची वाढ दिसली. टेक्निकली रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी हे निफ्टीतील हेडलाइन इंडेक्स राहीले. निफ्टीने बुलिश कँडल फॉर्म झाली आहे. मात्र, गेल्या आठवड्यात स्मार्ट प्रॉफिट बुकिंग दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळआत अपसाइडचा ट्रेंड 11300-11400 या लेव्हलपर्यंत दिसून येतो. तर इंडेक्सचा रेजिस्टन्स 11000-11040 असा सपोर्ट झोन राहू शकतो. 

News-In-Focus