जीएसटी दरकपात : कार, बाइकचे दर कमी होणार, जाणून घ्या किती होईल फायदा 

जीएसटी दरकपात : कार, बाइकचे दर कमी होणार, जाणून घ्या किती होईल फायदा 

द्योग क्षेत्रातील मंदीचे सावट आणि त्यापाठोपाठ कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे इतर क्षेत्रांप्रमाणे वाहन उद्योगाचे कंबरडेही मोडले आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धा आणि बदलाला सामोरे जाताने वाहन उद्योगासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. केंद्र सरकारने अनलॉकच्या प्रक्रियेबरोबरच आता या उद्योगाला बळ देण्यासाठी विविध सवलतींचा वर्षाव करीत अॅक्शन प्लॅनची तयारी केली आहे. याच टप्प्यात वाहनांवर लागू केलेला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अर्थाक जीएसटी कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकार विचार करत आहे. केंद्रीय उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. 

वाहन उद्योगाला दिलासा देण्यासाटी केंद्र सरकार दुचाकी आणि चारचाकी अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांवर लागू होणाऱ्या जीएसटीच्या दरात कपातीचा विचार करीत आहे. जर हा निर्णय अंमलात आला तर देशामद्ये कार आणि बाइकचे दक कमी होतील. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीच्यावतीने गेल्या अनेक दिवसांपासून कार, बाइकवरील जीएसटीच्या दरात कपातीची मागणी केली जात आहे. केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी यासंदर्भात पंतप्रधान तसेच अर्थमंत्र्यांशी चर्चा करू असे सांगितले आहे. यापूर्वी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीवेळी अर्थमंत्री सीतारमण यांनी या दरांमध्ये कपात केली जाईल असे संकेत दिले होते. मंत्री जावडेकर यांनी यासंदर्भातील प्रस्तावावर अर्थ मंत्रालयाच्यावतीने काम सुरू असल्याचे सांगितले. काळाची गरज ओळखून दुचाकी, तिनचाकी आणि पब्लिक ट्रान्स्पोर्टची वाहने याची वेगळी कॅटेगरी केली जाऊ शकते असे मंत्री जावडेकर यांचे म्हणणे आहे. त्यानंतर कार या सेगमेंटसाठी स्वतंत्र आणि अन्य वाहनांसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जीएसटीचे दर कमी केले जाऊ शकतात. सरकारकडून किमान 5 ते 10 टक्क्यांपर्यंत कपात केली जाऊ शकेल असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, केंद्र सरकार लवकरच ऑटो स्क्रॅप पॉलिसी लागू करण्याचा विचार करीत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार असून सर्व संबंधित घटकांनी याविषयी आपले म्हणणे मांडले आहे. लवकरच याबाबतची घोषणा सरकारकडून केली जाऊ शकेल असा विश्वास मंत्री जावडेकर यांनी व्यक्त केला. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे इन्सेंटीव्ह देऊन इंडस्ट्रीजला अधिक बळ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीतील तज्ज्ञांना, घटकांना असे वाटते की वाहनांवरील जीएसटी घटविल्याचा सरकारला फायदाच होईल. या उद्योगाने कायमस्वरुपी दर कपातीची मागणी केलेली नाही. काही ठराविक कालावधीसाठी ही दरकपात आवष्यक असल्याचे संबंधित घटकांचे मागणे आहे. अशावेळी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांसह सर्व घटकांची चर्चा करून हा निर्णय घेतला जाणार आहे. 

News-In-Focus