अतिरिक्त बँक अकाउंट बंद करताय, या 4 गोष्टी लक्षात ठेवा 

अतिरिक्त बँक अकाउंट बंद करताय, या 4 गोष्टी लक्षात ठेवा 

खासगी क्षेत्रातील कर्मचारी, उद्योगपतींकडे एकापेक्षा अधिक बँक अकाउंट असतात. कर्मचारी जेव्हा नोकरी बदलतात, तेव्हा त्यांना नवे बँक खाते उघडावे लागते. काही बँका ग्राहकांना झिरो बॅलन्स सॅलरी अकाउंट देतात. मात्र, काही महिने त्यावर पगार जमा न झाल्यास त्याचे रुपांतर सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये केले जाते. त्यानंतर काही बँकांमध्ये बचत खात्यांमध्ये किमान बॅलन्स ठेवणे अनिवार्य असते. मात्र, ग्राहकांना एकापेक्षा अधिक खात्यांमध्ये किमान बॅलन्स ठेवणे अनेकदा शक्य होत नाही. परिणामी अशी खाती बंद करताना काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. 

जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक बँक खाती असतील, आणि त्यावर कोणतेही ट्रन्झॅक्शन नसले तर ती खाती तुम्ही बंद करू शकता. कारण, अशा खात्यांचा वापर नसला तरीही त्यांना सरासरी तिमाही किमान बॅलन्स ठेवावा लागतो. त्यापेक्षा असे बँक खाते बंद करणे उपयुक्त ठरते. जर असे बँक खाते बंद करत असाल तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. 

बँकेतील खाते बंद करण्यासाठी खातेधारकाला ब्रँचमध्ये जाणे गरजेचे ठरते. बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन खातेधारकाला अकाउंट क्लोजर फॉर्म भरावा लागतो. या फॉर्मसोबत डी-लिंकिंग फॉर्म भरावा लागेल. सोबतच चेक बुक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड बँकेत जमा करावे लागते. बचत खाते उघडल्यानंतर १४ दिवसांत जर ते तुम्ही बंद करत असाल तर त्यावर कोणतही शुल्क लागत नाही. मात्र, खाते उघडल्यानंतर एक वर्षाच्या आत जर तुम्ही अकाउंट बंद करीत असाल तर बँकांकडून काही शुल्क वसूल केले जाते. यासाठी विविध बँकांकडून वेगवेगळे शुल्क आकारले जाऊ शकते. तसेच खाते उघडल्यानंतर एक वर्षाच्या आत खाते बंद करीत असाल तर त्यावर शुल्क आकारले जात नाही. 

जर तु्म्ही तुमचे वापर नसलेले बँक खाते बंद करीत असाल तर पहिल्यांदा तुम्हाला त्या खात्यावरील ऑटोमेटिक डेबिट्स बंद करावे लागतील. तुम्ही आपले खाते बंद करताना आपल्या अकाउंटला लिंक केलेले डेबिट्स डिलींक करून घ्यायला हवेत. जर तुमच्या या बँक खात्याला मासिक कर्जाचा इएमआय लिंक असेल, तर तुम्हाला आपल्या कर्जदार बँकेला तुमचा नवा बँक अकाउंट नंबर द्यायला हवा. जर तुम्ही तुमचे जुने सॅलरी अकाउंट बंद करीत असाल, तर आपल्या नव्या नोकरीच्या ठिकाणी नव्या खात्याचे डिटेल्स द्यायला हवेत. तरच तुमचा पगार अथवा पेन्शन नव्या खात्यावर क्रेडिट होऊ शकेल. 

News-In-Focus