या म्युच्युअल फंडने सुरू केला बॅलन्स्ड अॅडव्हान्टेड फंड, जाणून घ्या सर्व काही
पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाने पीजीआयएम इंडिया बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड लाँच केला आहे. हा एनएफओ सबस्क्रिप्शनसाठी खुला आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना 29 जानेवारी 2021 पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी आहे. या फंडचा बेंचमार्क इंडेक्स क्रिसील हायब्रिड 50+50 मॉडरेट इंडेक्स आहे. गुंतवणूकदारांच्या उत्पन्नात वाढ आणि त्याचे वितरण हे या फंडाचे उद्दीष्ट आहे.
इक्विटी आणि फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंटमध्ये याचे अॅसेट निश्चित केले आहे. यासाठी इक्विटी डेरिव्हेटीव स्ट्रॅटेजी, ऑर्बिट्रेजची संधी आणि पूर्णपणे इक्विटीसाठीची गुंतवणूक संधी आहे. या स्कीममध्ये इक्विटी आणि फिक्स्ड इन्कम अॅसेटमध्ये गुंतवणूक विभागणी करून व्होलॅटीलीटी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. फंडचे नियोजन अनिरुद्ध नाहा, कुमारन रामकृष्णन आणि आनंद पद्मनाभन करतील. पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाचे सीईओ अजित मेनन म्हणाले, हा गुंतवणूकीचा सर्वोत्तम पर्याय आहे. हे एक नव्या मॉडेलवर काम करतो. त्यामध्ये इक्विटी आणि फिक्स्ड इन्कम यामध्ये बॅलन्स साधला आहे. त्यातून गुंतवणूकादारांना टॅक्स वाचविण्याची संधी मिळते. त्यामुळे याचे ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्याचीही गरज नाही. यासाठी पंधरा वर्षांचे रोलिंग पीई अॅव्हरेजला लाँग अॅव्हरेज पीईच्या स्तरावर मानले पाहिजे. त्यातून इक्विटी मार्केटमधील बदलत्या ट्रेंडची संधी साधता येईल. जे मॉडरेट हाय रिस्क घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा फंड उत्तम आहे.
गुंतवणूकदारांना ही एक चांगली संधी आहे. या स्कीममध्ये किमान गुंतवणूक 5,000 रुपये आहे. त्यानंतर इथे 1 रुपया मल्टिपल वाढ आहे. अतिरिक्त गुंतवणूक रक्कम 1,000 रुपये आहे. इक्विटीमध्ये किमान 65 टक्के गुंतवणूक डायरेक्शनल इक्विटी आणि ऑर्बिट्रेज यांचे मिश्रण असेल. या स्कीमला सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानमध्येही (एसआयपी) जोडता येईल. एएमसीच्या अंतर्गत लाइफ इन्शुरन्स कंपनीच्यावतीने ग्रुप लाइफ इन्शूरन्स कव्हरही असेल. इन्शूरन्स कव्हरसाठीचा प्रिमियम एएमसीकडून दिला जाईल.