वृध्दत्वात आर्थिक स्वावलंबनासाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय

वृध्दत्वात आर्थिक स्वावलंबनासाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय 

    प्रत्येकजण तरूणपणीच सुखी वृध्दत्वाची स्वप्न बघत असतो, पण त्यासाठी तरूणपणापासूनच काही रक्‍कम बचत करावी लागते. त्याचबरोबर ती अशा ठिकाणी गुंतवावी लागते, जेथून आपल्याला आपल्या म्हातारपणी चांगली रक्‍कम आपल्या हाती पडू शकेल. जेणेकरून आपण कोणावरही आर्थीकदृष्ट्या अवलंबून न राहता  स्वावलंबी जीवन जगता येईल. पण जर आपण निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी काहीच बचत केली नाही, तर मात्र आपले जगणे प्रचंड खडतर आणि कष्टदायक होवू शकते. 
    बचतीच्या पारंपरिक पध्दतीमुळे निवृत्तीनंतरही लोकांना काही लाचारीचे जीवन जगणे भाग पडते. कारण त्यांनी केलेल्या गुंतवणूकीतूत त्यांना पुरेसे पैसे मिळत नाहीत. वाढलेली महागाई आणि तुटपुंजी बचत यामुळे वृध्दापकाळात आपण जितके जास्त दिवस जगू,  तितके आपण  गरीब होत जातो. वाढती महागाई आणि बचतीतून मिळणारे उत्पन्‍न याचा ताळमेळच बसत नाही.
    आपल्याला जर तुटपुंज्या पैशावर गुजराण करायची नसेल आणि निवृत्तीनंतरही आर्थीक स्वातंत्र्य हवे असेल तर आपल्याला आपले गुंतवणूकीचे पारंपरिक मार्ग बदलावे लागतील. नोकरी दरम्यान थोडी थोडी रक्‍कम गुंतवणूक करून आयुष्याच्या उत्तरार्धात त्या रक्‍कमेतून भरभक्‍कम परतावा मिळवायचा असेल तर   म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीशिवाय दुसरा चांगला पर्याय सध्यातरी नाही.
    समजा आपण निवृत्त होताना आपल्याकडे एक कोटी रूपयांची बचत असेल आणि तुम्ही ती रक्‍कम बँकेत ठेव म्हणून ठेवल्यास तुम्हाला वर्षाला साधारण सात लाख रूपये व्याज मिळेल, म्हणजेच तुमचे  निवृत्तीनंतरचे वार्षिक उत्पन्‍न असेल एक कोटी सात लाख रूपये.  पण या वर्षीचा महागाई दर जर 5 टक्के असेल तर आपले उत्पन्‍न होईल एक कोटी 5 लाख रूपये असेल. याचा अर्थ असा की, पुढील एक वर्षासाठी तुम्हाला केवळ 2 लाख रूपये खर्चासाठी शिल्‍लक उरतील. म्हणजेच महिण्याकाठी तुम्ही 16 हजार रूपयेही खर्च करू शकाल. 
    तुम्हाला काय वाटत की,  एक मध्यमवर्गीय दाम्पत्याची गुजराण महिण्याला 16 हजार रूपयांत होईल. त्याचे उत्तर आहे, बिल्कुल नाही. काही बँकामधील गुंतवणूक तर यापेक्षा कमी असते, तर पोस्टातील काही गुंतवणूक स्कीम्स्मध्ये चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. पण तरीही पारंपरिक गुंतवणूकीतून मिळणारा परतावा आपल्यासाठी पुरेसा असेलच, याची शाश्‍वती देता येत नाही. कारण व्याज दर आणि महागाई दर यांच्यात नेहमीचे ‘काँटे की टक्‍कर’ असते. त्यामध्ये अनेकदा महागाई दराचाच विजय होतो. त्यामुळे एका मध्यमवर्गीय दाम्पत्याला त्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात घालविण्यासाठी महिण्याला किमान 50 हजार रूपयांची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी त्यांच्याकडे कमीत कमी तीन कोटी रूपयांची बचत असणे जरूरीचे आहे. एवढेच नाही तर व्याजाच्या माध्यमातून मिळणार्‍या परताव्यावर 30 हजार रूपये टॅक्स भरावा लागेल.
    इक्‍विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा अत्यंत वेगळी आणि जादा परतावा देणारी आहेे. अनेकदा म्युच्युअल फंड गुंतवणूकीतील  परतावा कमी-जास्त होवू शकतो. मात्र म्युच्युअल फंडमधून मिळणारा परतावा पारंपरिक गुंतवणूकीपेक्षा जास्त असतो. उदाहरणार्थ म्युच्युअल फंडांनी गेल्या पाच वर्षात महागाई दरापेक्षा 7 टक्के परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीतून मिळणार्‍या परताव्यावर टॅक्स द्यावा लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स आपण बँकेतून काढणार्‍या रक्‍कमेवर केवळ 10 टक्के इतकाच आहे. आणखी एक फायद्याची गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडमधून महिण्याला 50 हजार रूपयांची कमाई करण्यासाठी आपल्याला तीन कोटी नाही तर जास्तीत जास्त दीड कोटी रूपये गुंतवावे लागतात. हल्‍ली काही मोजक्या गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील फायदे समजू लागले आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे  म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपण दिर्घ काळाचा विचार करावा. कारण म्युच्युअल फंडामध्ये जितका दिर्घवेळ गुंतवणूक असेल तितका चांगला परतावा मिळतो.
(Published On 14/03/2020)

News-In-Focus