एमेझॉनचा ईको इनपुट पोर्टेबल स्मार्ट स्पीकर भारतात दाखल

एमेझॉनचा ईको इनपुट पोर्टेबल स्मार्ट स्पीकर भारतात दाखल 
    एमेझॉनच्या ईको स्मार्ट स्पीकर्सला मागणी वाढत आहे. भारतामध्येही या प्रॉडक्टला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2018मध्ये भारतात एकूण 7.53 लाख स्पीकर्सची खरेदी झाल्याचे एमेझॉनचे म्हणणे आहे. आता भारतातील ग्राहकांसाठी एमेझॉनने नविन ईको इनपुट पोर्टेबल स्पीकर लॉन्च केला आहे. मूळ रुपये 5,999 किंमत असलेल्या हा स्पीकर मात्र फक्त रुपये 4,999 ला ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. हा ईको स्मार्ट स्पीकर वायरलेस असून कोठेही सहजपणे बाळगता येतो. 10 तास बॅकअप असलेली 4800 एमएएच बॅटरी असलेल्या या स्पीकरला 4 मायक्रोफोन जोडता येतील असे, कंपनीचा दावा आहे.
(Published On 21/03/2020)

Techno Trend