जिओ ग्लासचे लाँचिंग : स्मार्ट चष्म्यासोबत व्हिडिओ कॉ़लिंग 

जिओ ग्लासचे लाँचिंग : स्मार्ट चष्म्यासोबत व्हिडिओ कॉ़लिंग 
भा
रतातील अग्रगण्य रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ ग्लासचे लाँचिंग करण्यात आले. जिओ ग्लास ही चष्म्यासोबतची एक संमिश्र, स्मार्ट टेक्नॉलॉजी असून व्हिडिओ कॉलिंगची सोय यामध्ये करण्यात आली आहे. यासाठी व्हर्च्युअल असिस्टन्स सपोर्टही देण्यात आला आहे. खासकरून होलोग्राम कंटेटसाठी याची रचना करण्यात आली आहे.  
रिलायन्सच्या एजीएममध्ये चेअरमन मुकेश अंबांनी यांनी जिओमीट या नव्या अॅपबद्दलही माहिती दिली. लाँचिंगनंतर खूप कमी कालावधीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप 50 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. जिओमीट हे अॅप क्लाउडवर आधारित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म आहे, की जे अॅप आणि डेकस्टॉप या दोन्ही ठिकाणांहून वापर केला जाऊ शकेल.  

काय आहे जिओ ग्लास ?
जिओग्लासची घोषणा करताना दरवर्षी आपल्या वार्षिक सभेत नव्या प्रॉडक्टची घोषणा करण्याची परंपरा रिलायन्सने कायम राखली. जिओ ग्लासच्या माध्यमातून व्हर्च्युअल पद्धतीने 3डी प्रकारात कम्युनिकेशन साधता येते. कार्यक्रमावेळी याचा डेमो दाखवला गेला. जिओ ग्लासच्या माध्यमातून एकमेकांशी बोलण्याबरोबरच एकाचवेळी दोन व्यक्तिंसोबत व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. 
 
3डी प्रकाराचा लुटा आनंद 
एकमेकांशी बोलण्यासोबतच तुम्ही या चष्म्यातून कॉल केलेल्या व्यक्तीला थ्रीडीच्या रुपात पाहू शकता. जिओ ग्लास थ्रीडी आणि 2डी असा दोन्ही प्रकारचा टेक्निकल सपोर्ट आहे. याचे वजन अवघे 75 ग्रॅम आहे. हे याचे अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य बनू शकेल. 

25 अॅप्सचा सपोर्ट 
यासोबतच जिओ ग्लासमध्ये स्मार्टफोनचा कंटेंट अॅक्सेस करण्याचीही सोय आहे. यासाठी केबलचा वापर करावा लागेल. जिओ ग्लाससाठी एकूण 25 अॅप्सचा सपोर्ट दिला गेला आहे. विविध प्रकारच्या ई-क्लासमध्ये होलोग्राफिक्स कंटेंटसाठीही याचा वापर केला जाऊ शकेल. मात्र, याच्या किंमतीबाबत अद्याप रिलायन्सने कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

Techno Trend