व्हॉट्सॲप देणार स्वतंत्र वॉलपेपर फिचर

व्हॉट्सॲप देणार स्वतंत्र वॉलपेपर फिचर

नलाइन मेसेजिंग ॲप्लिकेशन व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी नव फिचर आणत आहे. याच्या माध्यमातून युजर्स वेगवेगळ्या चॅटसाठी वेगवेगळे बॅकग्राउंडचे वॉलपेपर ठेऊ शकणार आहेत. नव्या फिचरचे टेस्टिंग सुरू असल्याचे सांगण्यात येते. सद्यस्थितीत एकावेळी एकच बॅकग्राउंड सर्व प्रकारच्या चॅटिंगसाठी उपलब्ध आहे. मात्र, वेगवेगळ्या ग्रुप्सना तोच वॉलपेपर वापरावा लागतो. युजर्सना नव्या फिचरमुळे पर्याय मिळणार आहेत. 

व्हॉट्असॲपचे नवे फिचर डेव्हलप झाल्यानंतर ते पहल्यिांदा बीटा अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध होईल. त्यानंतर ते इतर युजर्सना देण्यात येणार आहे. व्हॉट्सॲपवर युजर्सनी डिफॉल्ट वॉलपेपर ऑप्शन स्वीकरला तर वॉलपेपर ॲप डाउनलोड करण्याची रक्विेस्ट येईल. हा ऑफिशियल व्हॉट्सॲपचा प्लॅटफॉर्म असेल जिथे सर्व वॉलपेपर मिळतात. याशिवाय बिटा व्हर्जनमध्ये अनेक मजेदार फिचर्स देण्यात आली आहेत. ग्रुप कॉलसाठी रिंगटोन, काँटॅक्ट शॉर्टकट, स्टीकर ॲनिमेशन अशी विविध फिचर्स डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये आहेत. सद्यस्थितीत व्हॉट्सॲप वापरणाऱ्या युजर्सना स्टोअरेजची समस्या भेडसावते. अशा युजर्ससाठीही खास डेव्हलपमेंटचा प्रोग्रॅम सुरू आहे. यानुसार नवे फिचर लाँच केले जाणार आहे. हे स्टोरेजची समस्या सोडवेल. युजर्सच्या मीडिया फाइल्सनी स्मार्टफोनमध्ये किती स्पेस घेतली आहे याविषयी माहिती देणाऱ्या या नव्या फिचरच्या मदतीने युजर त्या फाइलबाबतचा नर्णिय सहजपणे घेऊ शकतील.  

Techno Trend