फेसबुक-इन्स्टाग्राम अकाउंट करा लिंक

फेसबुक-इन्स्टाग्राम अकाउंट करा लिंक

फेसबुकने आपल्या युजर एक्स्पिरीयन्स अधिक चांगला करण्यासाठी काही पावले उचलली आहेत. सातत्याने फिचर्सचे अपडेट्स देण्यात येत आहेत. आता फेसबुककडून इन्स्टाग्राम अकाउंट लिंक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. फेसबुकच्या या फिचरची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता हे फिचर लाइव्ह झाल्यानंतर फेसबुक अकाउंटवर इन्स्टाग्रामची स्टोरी डिस्प्ले केली जाईल. यामुळे युजर्सना खूप सोय होणार आहे, जे एकाचवेळी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह राहतात. याशिवाय, फेसबुकवरून इन्स्टाग्राम अकाउंट लिंक झाल्याने युजर्सना ट्रॅफिक इम्प्रुव्ह करण्यास मदत होईल. 

सोशल मीडिया एक्स्पर्ट्सच्या मते फोटो शेअरिंग अॅपच्या नव्या फिचरचे काही ठराविक युजर्सना कंपनीच्यावतीने इन्स्टाग्राम स्टोरी फेसबुकला लिंक करण्याचे नोटिफिकेशन देण्यात आले आहे. फेसबुकनेही आपले फिचर कन्फर्म केले आहे. या नव्या फिचरवर आणखी काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातून इन्स्टाग्राम स्टोरी फेसबुकवर दिसण्याबाबतचा ऑप्शन उपलब्ध होईल. सोबतच युजर्सना फेसबुकवरच ही माहिती मिळेल की आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला किती जणांनी रिप्लाय दिला आहे किंवा किती जणांनी स्टोरी पाहिली आहे. फेसबुकने आपल्या युजर्सना युनीफाइड इंटरफेस देण्याचा प्रयत्न केला जात आहे. फेसबुककडून अन्य फिचर्सवर काम केले जात आहे. ज्यामध्ये युजर्सना आपल्या फेसबुक मेसेंजरला इन्स्टाग्राम मेसेजला लिंक करता येईल. इन्स्टाग्राम युजर जर आपल्या अकाउंटवर फेसबुकवरून लिंक देऊ शकतील. ती आता इन्स्टाग्रामची स्टोरी फेसबुकवरही पाहता येईल. 
 

Techno Trend