वनप्लसचा फिटनेस बँड, जाणून घ्या खास बात

वनप्लसचा फिटनेस बँड, जाणून घ्या खास बात

न प्लस कंपनीकडून नवा फिटनेस बँड लाँच केला जात आहे. कंपनीने बँडच्या लाँचिंग डेटबाबतही माहिती दिली आहे. यापूर्वी ट्वीटरवर वन प्लसने अपकमिंग फिटनेस बँडचा टीझर जारी केला होता. या बँडची किंमत सुमारे 2,499 रुपयांच्या आसपास असू शकेल. या बँडची स्पर्धा प्रख्यात कंपनी शाओमीच्या फिटनेस ब्रँड एमआय बँड 5 सोबत असेल. या वन प्लसच्या अपकमिंग ब्रँडमध्ये काही कमालीचे फिचर्स पहायला मिळू शकतात, जे नेहमी स्मार्टवॉचमध्ये असतात. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या फिटनेस बँडमध्ये 24/7 हार्ट रेट मॉनिटर आणि ब्लड सॅच्युरेशन मॉनिटर SpO2ची सुविधा मिळू शकेल. हे दोन्ही फिचर कोरोनाच्या काळात उपयुक्त ठरतील. साधारणतः SpO2 मधून आपल्याला रक्तातील ऑक्सिजनची लेव्हल कळू शकते. कोरोनाच्या काळात लोकांमध्ये ऑक्सिजन लेव्हल खालावते. अशा वेळी हा बँड अतिशय मौल्यवान माहिती देणारा ठरू शकतो. वन प्लस फिटनेस बँड स्लीप ट्रॅकिंग फिचरसह मिळेल. यामध्ये 1.1 इंच टच अमोलेड डिस्प्ले असेल. यामध्ये कलर डिस्प्लेही असू शकेल. फिटनेस बँडसोबत अनेक रंगांचे स्ट्रिप्स मुळ शकतील. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हा बँड सिंगल चार्ज केल्यावर त्याची बॅटरी चौदा दिवस सुरू राहिल. बँडमध्ये स्पोर्ट्स आणि एक्सरसाइज ट्रॅकिंगसाठी विविध तेरा मोड असतील. IP68- सर्टिफिकेशनसोबतच हा बँड धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहिल. वनप्लस फिटनेस बँड ई कॉमर्स साइट अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. सोबतच हा बँड ऑफलाइन स्टोअर्समध्येही मिळू शकेल. 
 

Techno Trend