अॅरोने लाँच केला बीएक्स ९० प्रो वायरलेस नेकबँड

अॅरोने लाँच केला बीएक्स ९० प्रो वायरलेस नेकबँड

प्रख्यात इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अॅरोने भारतात आपला नवा बीएक्स ९० प्रो वायरलेस नेकबँड इअरफोन लाँच केला आहे. अत्यंत स्लीक डिझाइनच्या या नेकबँड इअरफोनची कपॅसीटी ९० तास स्टँडबायची आहे. याच्या अनोख्या डिझाइनमुळे नेकबँडचा मानेवर दबाव पडत नाही. याशिवाय नेकबँडला गुगल असिस्टंट आणि सिरीचा सपोर्ट देण्यात आला आहे. 

बीएक्स ९० प्रो वायरलेस इअरफोनमध्ये अत्यंत चांगल्या क्वालिटीचा पॉवरफुल बास आहे. सोबतच यामध्ये ९० एमएएचची दमदार बॅटरी आहे की जी सिंगल चार्जिंगमध्ये ६ तासांचा बॅकअप देते. बॅटरीला चार्जिंगसाठी दीड तासांचा कालावधी लागतो. युजर्सना इअरफोनमध्ये सॉफ् इअरबँड मिळतात. या वायरलेस इअरफोनमध्ये कनेक्टिव्हीटीसाठी ५.० ब्लूटूथ व्हर्जन आहे, ज्याची रेंज १० मीटरची आहे. याशिवाय, इअरफोनमध्ये नॉइस कॅन्सिलेशन फिचरसह मल्टीफंक्शन बटन आहे. त्याद्वारे युजर व्हॉल्यूम कंट्रोल करण्यासह कॉल पिक अप, ड्रॉप करू शकतात. या इअरफोनची किंमत १२९९ रुपये आहे. ग्रीन, व्हाइट, ब्लॅक आणि रेड अशा चार कलर्समध्ये इअरफोन उपलब्ध आहे. रिटेल स्टोअर्समध्येही हा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापूर्वी कंपनीने गेल्या महिन्यात भारतात आपली वायर्ड इअरफोन रेंज एमएक्स लाँच केली होती. यामध्ये सराउंड साउंडचाही आनंद घेता येतो. एमएक्स सिरीजमध्ये इअरफोनचे दहा विविध मॉडेल्स आहेत. 


 

Techno Trend