इन्स्टाग्रामचे नवे सेफ्टी फीचर : टीनएजर्स होणार सेफ 

इन्स्टाग्रामचे नवे सेफ्टी फीचर : टीनएजर्स होणार सेफ 

न्स्टाग्रामने आता टीनएजर्सच्या सेफ्टीकडे गांभीर्याने पाहाण्यास सुरुवात केली आहे. कंपनी लवकरच काही फिचर्स देणार आहे. त्यातून खास करून लहान मुले अथवा टीनएजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन त्याचे डिझाइन करण्यात आले आहे. इन्स्टाग्रामने मंगळवारी अपनी नवी टेक्नोलॉजी सादर केली. कमी वयाच्या मुलांना अकाउंट तयार करण्यापासून रोखणे आणि  ज्येष्ठ व्यक्ती ज्या युजर्सना ओळखत नाहीत, त्यांच्याशी संपर्क करण्यापासून त्यांना रोखणे असा या फिचरचा उद्देश आहे. 

कमी वयाच्या मुलांना अकाउंट काढण्यास मनाई 

इन्स्टाग्रामवर कमी वयाच्या युजर्सना शोधण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचा वापर केला जाईल. साइन-अप करताना यूजर्सच्या याचा वयाची माहिती मिळवली जाईल. बहुतांश लोक आपले खरे वय सांगतात असे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र टीनएजर्स आपली जन्मतारीख खोटी सांगू शकतात. हे वय ऑनलाइन व्हेरिफाय करणे कठीण बाब आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग टेक्निकडेव्हलप केले जात आहे. त्यातून टीनएजर्सना सुरक्षित ठेवले जाईल. 

टीनएजर्ससोबत अनोळखी वयस्कांचा संपर्क खंडीत  

कंपनी एक नवे फिचर आणत आहे. त्यातून जे वयस्कर युजर्सना 18 पेक्षा कमी वयाच्या युजर्सना मेसेज पाठविण्यापासून रोखले जाणार आहे. अनावश्यक संपर्काला यातून आळा घातला जाईल. हे फिचर मशीन लर्निंग टेक्निकचा वापर करून लोकांच्या याचा अंदाज लावेल. शिवाय साइन अप करताना सांगितलेल्या वयाचाही आधार घेतला जाईल. जे वयस्कर व्यक्ती टीनएजर्ससोबत संवाद करताना संदिग्ध व्यवहार करतात, त्यांना रोखण्यासाठीही कडक पावले उचलली आहेत. अशी टीनएजर्सची अकाउंट वयस्कर व्यक्तिंना दिसू नये अशी दक्षता घेतली गेली आहे. 

Techno Trend